होते कुंठीत मती
होते कुंठीत मती
कुष्ठरोग कुष्ठरोग याची रुपे किती किती
कुणी म्हणे महारोग कुणी म्हणे रगतपिती
अंधश्रद्धा या पाहून होते कुंठीत रे मती......१)
शाप कुणा वाटे , वाटे देवाचा की कोप
नाही शाप नाही पाप सारी जंतूचीच कृती
अंधश्रद्धा या पाहून होते कुंठीत रे मती......२)
आले विज्ञानाचे युग, सारे संपले रे भोग
सरुनी अंधकार उजळे ज्ञानज्योती
अंधश्रद्धा या पाहून होते कुंठीत रे मती......३)
होता रोगांचे निदान , ठेवा उपचाराचे भान
उपचारानेच अंती टळेल विकृती
अंधश्रद्धा या पाहून होते कुंठीत रे मती......४)
देवा मागणे हेच एक आहे तुजप्रती
रंजल्या गांजल्याची ठेव आमच्या मनी प्रिती
अंधश्रद्धा या पाहून होते कुंठीत रे मती.......५)
