हंबर
हंबर
क्षितिज अंजुरात शुक्रचांदणी खुलता,
टप्पार गडकोणात उतरले रेशीम धुके।
उर्वी गारव्याच्या आगीत अंबर झुलता,
श्रांत मदन-मंजिरी का श्वास हंबर रुके।।
रजनी तमाच्या चिलमनी प्राची उलता,
धानी तृणात दहिवर मोती झुंबर झुके।
देव गाभारी भाव गाठीत दुर्वात घुलता,
अडकल्या प्रितीचे अधरात संवाद मुके।।
कई सोनेरी किरणांचा भुईसांदी फुलता,
अधुऱ्या डावाचे जे द्यायचे ते अर्घ्य हुके।
कुण्या लेकराची माय उंबऱ्यास भुलता,
रंजीस पोर कातावूनी वहिवाटी भुके(खे)।।
