श्रावणभूल
श्रावणभूल
1 min
23.8K
कातळ काळ्या कपारी ,
बहर विखारी!
चढुणी घड्या प्रहरी ,
झाकोळ उतरी!
लुटत्या सुन्या खेम्याची,
घेऊन घोर उरी!
पारवा हा कोण डवरी,
पेलून मेघडंबरी!
कोणत्या रानवाटी ,
कोण हाकाटी मारी!
दिल्या सादेचा हुंकार,
हंबर द्वाही पसरी!
झुल्या जांभूळ बनी,
राघव-मैना कोरी!
थेंबात झुरले नभ ,
भुईस भूलून घसरी!
सर्द वाटा चिंबाडी ,
झिम्माड वारा भिंगारी!
नजरेचा पारा खुमारी,
काळीज का थरथरी!
देहात उठे काफरी ,
उन पाखरू बिल्लोरी!
होता का मेघ रिकामा ,
पोघ्यात ज्वार मंजिरी!
