STORYMIRROR

Abhishek Mitake

Inspirational

4  

Abhishek Mitake

Inspirational

हिरकणी

हिरकणी

1 min
552

माझा काळजाचा तुकडा

तान्हुला आहे गडाखाली

जाऊद्या मला इथून

विनिवते हिरकणी!


पहारेकरी आदेशाचे गुलाम

केविलवाणी विनंती नाकारली

माणुसकीशी दगा केला

पण चाकरी इमानेइतबारे केली!


बाळाचा चेहरा आठवून

हिरकणीचं हृदय पिळवटलं

त्याचं दुधासाठी रडणं

खोल कानात भिनलं!


परत वाड्यात परतताना

विचारांचे काहूर डोक्यात माजले

आशेचा धागा शोधताना

समोर उंच बुरुज दिसले!


पावले चालली झपाझप

मनात निर्धाराचा पर्वत घेऊन

तीच्याकडे पहातच राहिला

अशक्य कडा ठेंगणा होऊन!


किर्रर्र अंधारात हिरकणी

बुरुज उतरत होती

जो दिवसाढवळ्या उतरायला

धजत नव्हती मर्दाची छाती!


पावलोपावली कसरत होती

शेवटचा टप्पा होता जीवघेणा

सरळसोट कातळ खाली

वाटेचा तेथे नाही ठावठिकाणा!


आईची माया ममता

अफाट दैवी शक्तीत बदलेली

असंख्य अडचणी नी संकटावर

तीने नकळत लिलया मात केली!


पोचली बाळापाशी धावत

हृदयाशी कवटाळले तान्ह्याला

घेऊन कुशीत अलगद

मुक्त केले पान्ह्याला!


आली वर दुसऱ्या दिवशी

पहारेकरी तीला पाहून हैराण

उभे करा राजासमोर

आले मग फर्मान!


राजे झाले आश्चर्यचकीत

ऐकून तिची कहाणी

तोफांची सलामी घेत मग

तोच बुरुज नावाजला.... हिरकणी!


सर्व मातांना..मानाचा मुजरा!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational