पुन्हा एकदा
पुन्हा एकदा
1 min
424
पुन्हा तसाच एक विद्यार्थी
दरवाजाशी आला
सुन्न अशा अवस्थेत
उंबऱ्यातच बसला!
मौनात उत्तर होते
न विचारलेल्या प्रश्नाचे
पाणी होते भरलेले डोळ्यात
घरात नांदलेल्या पंचगंगेचे!
बोलायला शब्द फुटत नव्हते
भावना डोळ्यातूनच ओसंडत होती
आमच्यात तेव्हा फक्त आणि फक्त
नीरव शांतता होती...
जुन्या अनुभवाने
फक्त पाठीवर थाप दिली
तेव्हा तो जिद्दीने उठला
तसाच नि:शब्द लढायला निघाला...
