STORYMIRROR

Ankita Gupta

Inspirational Children

3  

Ankita Gupta

Inspirational Children

हिंदुस्तान

हिंदुस्तान

1 min
10

साऱ्या जगात उज्वल भारताचा तेजोमय तारा,

सर्वांमध्ये श्रेष्ठ आपला हिंदुस्तान हाच प्यारा।

गंगेच्या तीरावरची शुद्ध पवित्र हवा,

सह्याद्रीच्या शिखरांवरची वीरांची रुबाबदार छटा।

वेदांचे ज्ञान अन् संतांचा वारसा,

साऱ्या जगात मिरवतो आपला हिंदुस्तान अनमोल ठसा।

ताजमहालाची सुंदरता अन् अजिंठ्याची कला,

संस्कृतीची परंपरा अन् जपलेली एकता।

शेती, विज्ञान अन् युद्धक्षेत्रातही अग्रगण्य,

आपला देश सर्वांमध्ये सदा सर्वोच्च आदरणीय।

हरित निसर्ग अन् नद्या सळसळणाऱ्या,

सुर्यास्त अन् उगवतीची किमया मोहक करणाऱ्या।

देशासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांच्या कथा,

हिंदुस्तानासाठी नेहमी साजरा होतो जयजयकारांचा उत्सव।

जाती-धर्माचा भेदभाव बाजूला ठेऊन,

संपूर्ण देशाने एकत्र येऊन।

संकटे कितीही आली तरी,

हिंदुस्तानासाठी आम्ही देऊ तन-मन-धन खरेच कितीही।

साऱ्या जगात उज्वल भारताचा तेजोमय तारा,

सर्वांमध्ये श्रेष्ठ आपला हिंदुस्तान हाच प्यारा।

जय हिंद, जय भारत!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational