गुरुजी तुम्ही गुरु
गुरुजी तुम्ही गुरु
गुरुजी तुम्ही गुरु
ज्ञानसागरी महामेरू
ज्ञानज्योत पेटवा
काळोख मिटवा
खडुनं रंगवा फळा
गुरुजी तुम्ही
मुलांना शिकवा शाळा
अन् ताई तुम्ही
मुलांना शिकवा शाळा
ज्ञानाचा वटवृक्ष व्हा
शिकवण्याकडे लक्ष द्या
नका शोधू विरंगुळा
गुरुजी तुम्ही
मुलांना शिकवा शाळा
अन् ताई तुम्ही
मुलांना शिकवा शाळा
शिस्त लावा पण
भिस्त ठेवा
हळुवार जपा हा
अनमोल ठेवा
नका करू मारझोड
फुकाची ती उरफोड
जरा मुलांना लावा लळा
मुलं ही फुलं
जणू रोपटं तान्हूलं
हळू जपा त्यांना
उमलत्या ह्या कळ्यांना
फुलवा सानेगुरुजींच्या
स्वप्नातील ती बाग
फुलवा स्वप्नातील मळा.....
