STORYMIRROR

Tejrao Shelke

Inspirational

4  

Tejrao Shelke

Inspirational

कविता: मीराची बाहूली फॉरेनवाली

कविता: मीराची बाहूली फॉरेनवाली

1 min
521

ब्युटीफूल बॉबकट गालावर लट 

चंद्रावानी मुखड्यावर घुंगटपट 

अन् तोंडावर पावडर लाली..........


मीराची बाहुली फॉरेनवाली 

बघायला तीला गर्दी झाली 

सर्वांनी मिळून घुगऱ्या गिळून 

नाव तिचं ठेवलं डॉली 

डॉली S डॉली S डॉली..............


मीरासोबत खेळते जात्यावर पीठ दळते 

आवडीचा खेळ तिचा भातूकली 

खेळून दमते झोप आली म्हणते 

झोपतांना मात्र जोरजोरात घोरते 

गाव जागा करणं तिची सवयचं झाली.....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational