STORYMIRROR

Ankita Kulkarni

Romance

3  

Ankita Kulkarni

Romance

गुपित प्रेम माझे

गुपित प्रेम माझे

1 min
182

प्रेम माझे त्याच्यावर खूप अतूट ,

      पण लपविणे हेच माझे गुपित होते l


प्रेम त्याने दर्शविता, कठीण खूप,

         मला त्याला ,नाही सांगणे होते l


हसत हसत त्याला ठेवून ,

        रडत मात्र मी आतून होते l


दुसरी जवळ त्याला सोपवितांना,

           काळीज माझे पिरगळत होते l


सुखी आयुष्य त्याचे करताना, 

        रक्ताचे माझ्या पाणी होत होते l


माझा असता बघता दुसरी सोबत,  

        हृदयात माझ्या गलबलत होते l


लग्नात त्याच्या सजता साधताना,

          प्राण माझे कंठाशी येत होते l


प्रेम त्याच्यावर खूप पण, त्याची, 

        साथ देण्याइतके,आयुष्य कमी,

              असे माझे नशीब होते l


 प्रेम त्याच्यावर खूप अतूट,

      पण लपविणे, हेच माझे गुपित होते l     


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance