गुंता आठवणीचा
गुंता आठवणीचा
हिंदोळ्यावर झुलताना
मी पहिला होता वसंत
गुलमोहर रंगापरी
होता स्वर्गीय आसमंत।।1।।
सोबतीने तुझ्या गायला
मी पावसातला तराना
संगीत ताल छंदातला
अवरोह माझ्या सुरांना।।2।।
पदोपदी सोबत तुझी
जगण्यास होती प्रेरणा
विरहाने ह्या गगनात
पोरकी मी श्वासाना।।3।।
साद घालते क्षणोक्षणी
मनाला वाटे हुरहूर
जिवलग राजा तू माझा
शोधुस कुठे दूरवर।।4।।
गुंता माझ्या आठवणींचा
दुःख काही केल्या सुटेना
फिरून ये माघारी बघ
तुझ्याविन मज करमेना।।5।।
