गुढीपाडवा
गुढीपाडवा
नवं वर्षारंभी थाटू
उत्सवाची नवी गाथा
बांधू गुढीस पुस्तके
ज्ञान तेजाळतो माथा
विचारांची आरासता
चल नव्याने मांडुया
अंधश्रद्धा मोडुनिया
घाट नवाच साधुया
चैत्र मासी नवी आस
पालवीची सजे गाज
तृणवेली मोहरली
चैतन्याचा सूर ताज
कोकिळेचा कंठनाद
भुलवतो मना खास
वर्ष स्वागता ओंजळ
सारे रम्य भासे मास
पाने आंब्याची आणू
सजवूया ज्ञानतारा
डोळे दिले पणतीने
सरू तिमिराचा वारा
संकल्पाची कार्यशाळा
मनी बांधू जिद्द बरी
पुस्तकाशी करू मैत्री
गुढी उभारू ही खरी
