STORYMIRROR

Samreen Wadkar

Classics

3  

Samreen Wadkar

Classics

गरीबांची पोरं

गरीबांची पोरं

1 min
588

आम्ही गरीबाची पोरं

उन्हातान्हात वाढतो.

माय बापाच्या सोबत 

उभे आयुष्य काढतो.


नाही फोडला हूंदका 

कोणा हौस मौजेसाठी.

नाही कोणता कलह 

कोणा पुढे कोणा पाठी.


नाही कोणताच हट्ट 

पंचपक्वान्न खाण्याचा.

नाही बाळगला छंद

किल्ले महाली जाण्याचा.


नाही केली कोणाकडे 

अशी मोठेपणाची भाषा .

नाही ठेवली कधीही 

अशी मनामध्ये आशा.


नाही मागितली कधी

गाडी मोठी अलिशान .

नाही पसरला हात 

फुकट घेण्यासाठी दान.


आमचे काटेरी जीवन 

आम्हा मान्य आहे आता .

मरण ही यावे आता

घेता नाम हरी नाथा.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics