गोपाळ म्हणती
गोपाळ म्हणती
गोपाळ म्हणती कान्हया कृष्नातें ।
आजी यमुनेचे जळ वर्जा कां जी ॥१॥
हरी म्हणे तयातें तेथें बाऊ आला ।
म्हणोनि तया स्थळा नवजावें ॥२॥
ऐकोनियां पेंदा नाचतो दुपांडी ।
गदियांची मादि सवें घेत ॥३॥
बाऊ पहावया गडे हो अवघे चला ।
या कृष्णबोला राहुं नका ॥४॥
एका मागें एक गडी ते निघाले ।
एका जनार्दनीं आले यमुनेटीं ॥५॥
