गोड आठवणी !
गोड आठवणी !
शाळेतील आयुष्य तर गृहपाठातच जाते....
त्यातच एखादी मुलगी, पावडर न लावलेल्या तोंडाकडे बघते...
बघून मात्र मनातच हसते ...
खोडकर मित्राचं लक्ष माझ्याकडे च होतं....
त्यांना या संधीची वाटच लागलेली असते.....
वर्गात ती येते,आणि नाव माझं गाजते...
ते ऐकल्यावर माझं डोकं टेबलाखाली जाते....
कुणी बघत आहे का रागाने,याची जाणीव करून घेते...
मन मात्र मनातून खूप हसत हसते...
आठवून ते दिवस, ओठांवर माझ्या हसू मात्र येते....
कॉलेज ची लाईफ म्हणजे विषयच खोल....
ती नाही बोलली, तर दुसरीला बोल...
निवडणूक तरा लढवतो आम्ही...
पण दुसरेच निवडुन येतात आनापोल ...
केमिस्ट्री च्या तासाला मास्तर उभा करतो...
जे कधी वाचलच नाही,ते प्रश्न विचारतो...
उत्तर तर येणार नाही,माहीतच असतं
तरीसुद्धा सगळ्यांसमोर वर्गाबाहेर मला काढतो...
हळूच खिडकीतून मी "तिला" बघतो...
ती मला सोडून दुसर्यालाच बघते...
मन मात्र माझं आतून खूप रडतो....
दिवस आठवून मात्र,आजही ओठांवर हसू माझ्या येते....
शिक्षण संपल्यावर नोकरी साठी पुण्यात जातो....
तिथं जाऊन मन मात्र विस्कटतो...
पदवी साठी केलेली एवढी मेहनत वाया जाते..
तिथं तर सगळे आयटीआय लाच विचारते....
रागारागात मी मोबाईल उघडतो...
रात्रभर" शिक्षणाच्या आईचा घो" चित्रपट बघतो...
सकाळी उठून वडापाव खातो...
आणि संध्याकाळी गावाकडची गाडी पकडतो....
हे सर्व आठवून मात्र ओठांवर माझ्या हसू मात्र येतो.....