STORYMIRROR

Ajinkya Rathod

Tragedy

3  

Ajinkya Rathod

Tragedy

एवढे अनर्थ नेमकं कोणी केले !

एवढे अनर्थ नेमकं कोणी केले !

1 min
274

     नात्यांची दोर आता कापल्या जात आहेत.... 

        रक्ताच्या नाळ आता तोडल्या जात आहेत... 

       मायेचा पदर आता हरवत चालला आहे... 

        मुलीचा माहेरपण आता संपत चालला आहे... 

       घरात मंदिर तर दारोदारी झाली आता...

पण मंदिरातील देवमाणसांना आता घराबाहेर काढलं जात आहे.. .......


    म्हातारपण जात आहे पायी आता,पंढरपूर देहू,आष्टी

        हरवल्या आता लहान मुलांच्या गोष्टी.... 

       भावाला भावापासून दूर केलं.... 

       मुलाला आईबापांच्या सावली पासून दूर केलं.. 

       नातवांना आजी-आजोबा पासून दूर केलं... 

        सर्वांना दूर करून स्वतःच घर केलं...

पण कित्येक भावनांचा आणि प्रेमळ बंधनाचा खून केल....


     पोराचा गोजिरवाना पोरगं बघून,आई भारावते.. 

       दुरूनच बघून त्याला फ्लाईंग किस देते... 

      एवढं सगळं बघून बाप मात्र,हळहळतो.... 

      गुडघ्यात डोकं ठेवून ढसाढसा रडतो.... 

     काय चूक झाली माझी बोलून देवाशी भांडतो... 

     पोराला घडवण्यासाठी काय काय केल... 

     याचा सर्व चिठ्ठा मांडतो.... 

पोरगं दूर गेल्यावर मात्र लगेच धावून,नातवाचा मुका घेऊन येतो.......

   

   नवरा-बायको आयुष्य जगतात आरामात.... 

   खितपत पडलेली आहेत त्यांची आईबाप वृद्धाश्रमात.. 

   प्रश्न पडतो कधी कधी या मनात.... 

    मिळेल का रे जागा तुला नरकात ? 

  हम दो हमारे दो चा नारा आम्हाला जास्तच भावला... 

  बायको रडली म्हणून तू आईवडिलांवर धावला ... 

   त्यांचं रक्त पिऊन मोठा झालास तू... 

    त्यांच्या सोबतच रे असा वागला.... 

   तुझ्या साठी मेहनत करून झाले होते ते बेजार... 

   मनात आशा ठेवून की तू होणार त्यांचा आधार.. 

   ज्यांनी एकाचे दोन हात केले... 

   त्याच हातांनी त्यांना घराबाहेर काढले.... 

   रक्ताच्या नात्याला कायमचं जणू मृत घोषित केले.... 

   प्रश्न पडतो सारखा सारखा मनात...... 

   एवढे अनर्थ नेमकं कोणी केले ????? 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy