गझल
गझल


वृत्त : व्योमगंगा
पर्वताच्या पायथ्याला, यातनांचा गाव आहे,
भोगलेल्या यातनांना, जीवनाचे नाव आहे
जीवनाच्या सागराला, तारण्याचे ध्येय माझे,
वादळी लाटावरी ही, हेलकावत नाव आहे
बोलता रे गोड आती, गोड सारे गोड बोले,
साखरेच्या गोडव्याचा, फासण्याचा डाव आहे
मोगऱ्याच्या पालवीला, ना दिसे मज फूल कोठे,
खोल झाडाच्या मुळावर, घातलेला घाव आहे
टाक तू पाऊल पुढती, चालताना ताकदीने,
कालच्या रंकाबरोबर आजचाही राव आहे
यंत्र आणि तंत्र यांचा, चालला हा खेळ आहे,
प्रेम आणि भावनेला, त्यात कुठला वाव आहे
चोरट्यांना माज आला, रोज त्यांना भाव आता,
कुटनीतिच्या गळाला, लागला हा साव आहे