गझल
गझल
तुझ्याशी सारखे खोटे कसे बोलू जमत नाही
कसे मनमोकळे बोलू जरा कोडे सुटत नाही
कधीकाळी भरे शाळा तरूवर रोज पक्ष्यांची
हरवली ती कुठे राई कुणाला सापडत नाही
कधीही घेतला नाही विसावा काम करताना
मनाने खूप थकला पण कुणाला दाखवत नाही
नको देऊ दुरावा तू, नको सोडू अशी मजला
किती मी गाळले अश्रू , कुणी सांत्वन करत नाही
कधीही दोष का देतो तुझ्या भाग्यास तू मित्रा
पहा घावाविना कुठला दगड मूर्ती बनत नाही
