गझल : जागतिक महायुद्ध
गझल : जागतिक महायुद्ध
हजारो ने बळी गेले तुझ्या रागात नाही का
उडाली राख स्वप्नांची तुझ्या स्फोटात नाही का
कसे पेटून गेले प्रेमही आगीत देशांच्या
निघाले प्रेत प्रीतीचे तुझ्या युद्धात नाही का
मुलांनाही कसे सांगू अता मी पाठ शांतीचे
भविष्याचे इथे तारेच काळोखात नाही का
स्मशाना सारखे झाले कसे आयुष्य माझे हे
जळाले सर्वकाही रे तुझ्या जाळात नाही का
कुठे बर्फात जाऊ मी मनाच्या शांततेसाठी
मलाही घाल ना गोळी इथे डोक्यात नाही का
विमानाने कसा फेकून गेला बॉम्ब गोळ्यांना
इथे माणूस आहे तो तुझ्या देशात नाही का
असा घेऊन प्राणांना कसा जिंकून गेला तू
जरा थोडाच ओलावा तुझ्या डोळ्यात नाही का