घरटं...
घरटं...
संध्याकाळी, सूर्यास्त वेळी सहज त्या वृक्षाकडे पाहिले.
लहान सुंदर चिमणीची पिले
वाट पाहतात आईची .
आल्यावर ती
दाणा भरवेल आपल्या चोची
आई येताच आनंदी झाली पिले
आईला त्यांनी घरात बोलावीले.
घरट्यात सारे सायंकाळीच परततात.
म्हणुन
शहरात पाळणाघर उघडतात
सकाळी वडिल आई
बाळाला पाळणाघरात ठेवतात घाईघाई.
ट्रेन आणि बसेस पकडून
दिवसभर असतात हॉपीसच्या खुर्चीला जकडुन.
सायंकाळी परत जातांना बाळाला परत घेतात
घरि असतेच कुणीही आया
बाळाचे आई वडिल नेहमीच गेस्ट.
टु -रुम किचनचे प्लॅट बनले
ज्यात नाती गोती, जिव्हाळा नसतात.
टेलीफोन आणि दाराच्या बेल
नेहमीच वाजतात.
त्या चिमणीच्या घरट्याला बघून नेहमीच असे वाटते.
आजच्या आधुनिक युगात सर्वच आटते...
