घरापासून दूर जाताना ...
घरापासून दूर जाताना ...
घरापासून दूर जाताना
मन अगदी कासावीस होते...
शब्दात शब्द गुंतून
अंतकरण दाटून येते...
घरातील गोड आठवणी आठवून
मग झुरत राहते हे वेडे मन...
अन मागे वळून पाहताना
वाटत होते तसेच थांबून राहावे ते क्षण...
घर सोडल्यावर या स्वार्थी जगात
स्वतःलाच जेव्हा करावी लागते हिंमत...
तेव्हाच कळून येते प्रत्येकास
माय बापाची किंमत...
घरापासून दूर जाताना
मन होते दु:खी कष्टी नी लहान ...
परंतु खुणावत असतात स्वप्न सोनेरी
भविष्यात बनण्यास महान ....
