तुझ्यासाठी मन माझे झुरते
तुझ्यासाठी मन माझे झुरते
"तुझ्यासाठी मन माझे झुरते
पण हे तुला कुठे कळते ....
तुझ्याच आठवणींनी हृदय माझे खुलते,
अन् तुझ्या प्रीतीचं फुल माझ्या काळजात फुलते...
जिकडे तिकडे नजर माझी प्रिये फक्त्त तुलाच शोधते,
ध्यानी मनी स्वप्नी फक्त आणि फक्त तूच दिसते ...
भेटीसाठी तुझ्याच मन माझेे वारंवार तडफडते,
तुझ्या भेटी विना मन व्याकुळ होऊन रडते...
रात्रंदिन हे वेडे मन तुझ्या आठवणींत रमते,
"कसं सांगू तुला,
तुझ्यासाठी मन माझे झुरते...

