STORYMIRROR

Varsha Fatakale warade

Inspirational

4  

Varsha Fatakale warade

Inspirational

घडो सेवा ही भाषेची

घडो सेवा ही भाषेची

1 min
214

घडो सेवा ही भाषेची 

मला तिचा अभिमान

मायबोली मराठीचा

जगी होईल सन्मान


संतांचाच वारसा हा

नाळ मातीशी जुळली

संस्कृतीची ज्ञान वेल

भाषा शब्दांनी खुलली


नव रसांचा शृंगार,

शब्द समृद्ध पवित्र

ग्रंथ ह्यात पुरातन

शब्द फुलवी सर्वत्र


स्फूर्तीगीत अभंगाने

लोका केले हो सज्ञान

ओवी अनुभव गाती

गीते मिटविती अज्ञान


अमृताते पैजा जिंके

गोडी अवीट बहरे

मंत्रमुग्ध लेखणीचे

कधी ना आटती झरे


शालीनता बाज तिला

अभिजात दर्जा असे

सौंदर्यसंपन्न ऐसी

आरस्पानी रूप साजे


कस्तुरीचा दरवळे

गंध जणू चोहिकडे

रस हा अभिव्यक्तीचा 

मराठीचे बोल खडे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational