STORYMIRROR

Sangita Mane

Inspirational

3  

Sangita Mane

Inspirational

गावाकडील माणसं

गावाकडील माणसं

1 min
27.5K



गावाकडची माणसं

साधीभोळी थोडी

तर कुणाच्या अंगात

भलत्याच खोडी

पहाटेच्या प्रहरी

उठती सगळी 

करावया कष्ट 

पळती रानोमाळी

दमती भागती

राब राब राबती

भाकर कोरड्यास 

दाबून हाणती

पिपंळ पारावर

सांजंला गप्पा 

उकाळ्या पाकळ्यांचा

फुटे गोलगप्पा

तरण्याबांड पोरांचा 

वेगळाच रुबाब 

पोरीबाळी जातायेता 

बनतात नवाब

नदीचा पाणवठा 

महिलावर्ग खबरसत्र

तेलामीठासह होई

प्रसारीत बातमीपत्र 

चिल्यापिल्याची तर

भरते शाळा छान

खेळ खेळण्याची 

भागत नाही तहान

यात्रा जत्रा लग्न मुंज

धमाल करती बरे 

सुखदुःखात सर्वांच्या 

सामील होती सारे



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational