Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sobati Soundade

Inspirational

4.0  

Sobati Soundade

Inspirational

गाथा शेतकरी

गाथा शेतकरी

1 min
197


काय शोधताय महाभारतात , काय सांगतय रामायण 

नका सांगू मतही त्या भगवतगीतेची ही 

नाही सापडणार बायबलातही 

पाहू बोलतय का कुराण तरी 

अरे तोच देव, तोच प्रभू , तोच आहे खुदा कुठल्या तरी चौकटीत दिसावी किरे माझ्या शेतकरी राजाची पण गाथा


त्य बाजारात..

जे पिकत ते विकत नाही 

आणि जे विकत ते पिकत नाही 

अरे असं कसं एका रात्रीत भाव पायदळी तुडवतात

त्या शेतकरी राजाचा संसार मात्र उपासमारीत कोंडतात


गेल्या वर्षी कापूस केला

फुलतोय ना फुलतोय तोच रानातच त्याचा चिंब गालिछा झाला 

कधी वाट पहायला लावतो ;तर कधी वाट लावून जातो त्या पाण्याला तरी जीवन कसं म्हणाव 

त्य गालिछावरच निजाव की निजल्यावरच डोळे मिटाव 

आता तुम्हीच सांगा 

जगाच्या परपंच्यात हसावं की रडावं त्यान कसं जगावं 


चाललीये माणसामाणसात च कुरघोडी 

अरे तू स्वतःच्या अस्तित्त्वासाठी झगडतोयस 

असा एकटाच हिमतीबाज शेतकरी माझा 

जो थेट ब्रम्हांड निसर्गाशी लढतोय 


परिस्थितीशी लढता लढता कधी हतबल झाला कळलच नाही 

तिच्याच उदरात खोदली कबर ह्रदयाशीच बिलगली की हो काळी माती 


मागे राहिला तो फक्त..

खण्णकरण दगडावर आपटलेल्या तिच्या हिरव्या काकणांचा आवाज 

परत असा जन्म नको बहूतेक 

असचं सांगतोय तिचा सुवासिनीचा साज

शेतकरी होणं हाच आहे का दोष?

तो होता तिच्या सात जन्मांचा आक्रोश


बाबा परत घरी याल का?

बाबा परत आमच्याशी बोलाल का ?

ऐकताय का तुम्ही त्या चिमुकल्यांचा टाहो 

सरकर... नका पांघरू भरपाईची वस्त्रे 

कुणीतरी प्रेमाचा हात तरी द्या हो


शेवटी प्रश्न एकच पडतो???

ज्यांनी अख्खा जगाला आपल्या तालावर नाचवल

असे हे नायक नायिका 

त्यांच प्रेतही तिरंग्यात लखाखल 

आणि 

ज्यान या भारत देशाला जगवलं

शेवटी त्या शेतकरी राजाचं मडं बाकी 

पांढर्या कफनातच जळालं


Rate this content
Log in