मी मेल्यावर...
मी मेल्यावर...
मी मेल्यावर मला जाळू नकोस
आयुष्यभर जळालोय
आता आणखी चटके देऊ नकोस
क्षणाक्षणाला पायदळी तुडवलस
मातीला माझ्या पाया तु पडू नकोस
प्रेेेमाचा भुकेला होतो मी
गोरीवर माझ्या आता पंचपक्वान्न तू मांडू नकोस
ज्यावेळी कोसळलो त्यावेळी आधार नव्हता
मदतीचा हात पुुढे करताना चारवेळा बावचळलास
आता जनाच्या लाजेेेनं देहाला माझ्या खांंदा तु देऊ नकोस
क्षुुल्लक क्षुुल्लक कारणावरुन
सामोरे गेलो निंदा नालस्तीस
आता गुणगान&
nbsp;तू गाऊ नकोस
दोषाचा कलंक माथ्यावर घेऊन जगलो आयुष्यभर
बाजूला बसून माझ्या, कपाळावर हात मारत आता स्वतःला दोष तू देेऊ नकोस
कंटाळलो होतो आयुष्याला
नशीबाने पाठ फिरवली होती
दुःखाचा सुस्कारा टाकायला कुणी मनात किंचितशी जागासुद्धा दिली नव्हती
मग...
नको तेे विचार मेंंदू भोवती घिरटया घालु लागले
बास करू का जगणं अस मग मनच म्हणााले
तूच भाग पाडलयस
आता माघार घ्यायला सांगू नकोस
शेवट केलाय आयुष्याचा
आता वाट माझी अडवू नकोस