गाणं व लिहिणं
गाणं व लिहिणं
गाणाऱ्यांनी कधी कधी लिहावं
लिहिणाऱ्यांनी कधी कधी गावं
कधी हे घ्याव तर कधी ते द्यावं
देता घेता मधूनच वाटावं
गाणं लिहीता लिहीता वाटावं
लिहिणं गाता गाता वाटावं
आयुष्य गात गात जगावं
जीवन लिहीत लिहीत पुढ न्यावं
आयुष्य ही जगण्याची गाथा
जीवन ही सूर तालांची कथा
