एकता
एकता
प्राणाहूनी प्रिय मजला
आहे महाराष्ट्राची संस्कृती
एकोप्याने नांदती येथे
विविध धर्म, पंथ, जाती..
महाराष्ट्राची संस्कृती जपण्यात
आहे संतांचा मोठा वाटा
दिली सदाचाराची शिकवण
उसळती नेक विचारांच्या लाटा
महाराष्ट्राच्या संस्कृतीने जपले
पशु पक्षांचे महत्त्व सणवारातून
संस्कृतीचे जतन करतात
महाराष्ट्राच्या घराघरातून
महाराष्ट्राची संस्कृती
आहे विशाल आणि समृद्ध
करण्या तिचे संवर्धन
आम्ही नेहमीच राहू कटिबद्ध
