गरज स्वतःला बदलविण्याची
गरज स्वतःला बदलविण्याची
1 min
247
अमाप ज्ञान संपादित करून
गरज स्वतःला बदलविण्याची,
योग्य आचार विचार अंगिकारून
उत्तुंग व्यक्तिमत्व घडविण्याची.
कोणी कितीही करेल निंदा
त्याकडे लक्ष नाही द्यायचे,
ध्यास ठेऊनी मनी नवनिर्मितीचा
श्रेष्ठ विचार जीवनी घ्यायचे.
धावपळीच्या युगात आज
साऱ्यांची संकुचित झाली वृत्ती,
दीन दुबल्यांच्या न्याय हक्कासाठी
आपल्याकडून व्हावी नेक कृती.
थोरा - मोठ्यांचा आदर ठेऊन
जगी आपुलकीचे नाते जोडावे,
वाणीत असावे माधुर्य आपल्या
समानतेने प्रत्येकाशी बोलावे.
