माझा बाप शेतकरी
माझा बाप शेतकरी
माझा बाप शेतकरी
जगास देतो पोटभर,
स्वतः खातो अर्धी भाकर
दिवसरात्र शेतात राबतो मरमर
काळया मातीच्या खाणीत
सदा राबतो हरपूनी भान,
अपार कष्टाची त्याच्या
आज कोणासही नाही जाण
अवेळी पाऊस,सुका दुष्काळ
पाठी लागली साडेसाती सारी,
तरीही पिकवतो हिरव सोन
बाप माझा शेतकरी
शेतमालास नाही रास्त भाव
आहे त्याच्या दुःख आयुष्यात,
देशाची प्रगती तेव्हाच होईल
माझा शेतकरी असेल सुखात
