STORYMIRROR

Kshitija Kulkarni

Horror

3  

Kshitija Kulkarni

Horror

एकेक एकाकी

एकेक एकाकी

1 min
172

रात्र आहे

खूप विचारांची

भटकंती राहे

अनेक आत्म्यांची


गुढ दिवसाचे

कळेना काही

त्यात काळोखाचे

भय वाही


अनेक क्षण

मिळाले वाटे

त्यातून पण

गर्दी दाटे


एकेक एकाकी

शांतता चाले

उरलेले बाकी

उलटे झाले


पिळवटून टाकणारे

सांगाडे बघून

हसून दिसणारे

त्रांगडे लांबुन


काहीतरी विचित्र

धुक्याची चादर

पसरे सर्वत्र

आकृती दुर्धर



Rate this content
Log in

Similar marathi poem from Horror