STORYMIRROR

मल्हारी राख

Inspirational

4  

मल्हारी राख

Inspirational

एक दिवस माझाही येईल...

एक दिवस माझाही येईल...

1 min
770


शून्य आहे आता मी, 

शून्यातून माझं ही विश्व निर्माण नक्कीच होईल... 

वेळ आहे आता फक्त संघर्षाची 

जे हवं ते करण्याची वेळ ही नक्कीच येईल... 


खटाटोप होतोय मज विझवण्याचा कैकदा...

नाही मानत मी हार, मी तेवतो नव्याने पुन्हा एकदा...

पाहिलेल्या असंख्य स्वप्नांना 

सत्यात उतरवण्याचे हत्तीबळ माझ्यात नक्कीच येईल... 

एक दिवस माझाही नक्कीच येईल... 


कु - विचारांचा लोक करतात मजवर मारा... 

वाहून नेतील त्यांना मेहनतीच्या 

वाहणाऱ्या घामाच्या धारा 

मला नाउमेद करणारा माझ्याकडून 

जगण्याची उमेद एक दिवस नक्कीच घेईल... 

एक दिवस माझाही नक्कीच येईल...


माहितेय मला खूप खडतर आहे मार्ग, 

आणि खूपच वाईट आहे सध्याची वेळ... 

पण तरीही पराजीत नाही होणार आयुष्याचा हा खेळ... 

विजयाची माळ एक दिवस

माझ्या गळ्यात नक्कीच येईल... 

एक दिवस माझाही नक्कीच येईल...


Rate this content
Log in

More marathi poem from मल्हारी राख

Similar marathi poem from Inspirational