STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Tragedy

4  

MEENAKSHEE P NAGRALE

Tragedy

दुष्काळ

दुष्काळ

1 min
465

दुष्काळ एक समस्या

सांगा कस जगायचं

नाही पिकलं धान

कसं पोट भरायच..... !!


पाण्याविना शेत

पीक गेलं जळून

का येत नाही जीव

ये पावसा वळून....!!


लग्नाला आली पोर

कसं लगीन करायचं

दुष्काळ एक समस्या

सांगा कसं जगायचं...!!


सावकराच कर्ज अंगावर

सांगा कसं फेडायच

यंदा पीक गेलं सारं

कस लगीन करायचं....!!


नाही गुराला चारा

ढोराना कस जगवायच

शाळा सोडली पोरांनी

त्यांना कस शिकवायच...!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy