STORYMIRROR

Sakharam Aachrekar

Romance

3  

Sakharam Aachrekar

Romance

दुरावा कशाला...

दुरावा कशाला...

1 min
426

तुला पाहण्याचा, बहाणा कशाला

तुझ्याविन दुजा तो, सहारा कशाला


सखे सोबती रात्र ही चल विहारू 

हवा या निशेला किनारा कशाला


प्रिये या तमाची तुला काय चिंता 

उगा तारकांचा हवाला कशाला


तनाने मनाने जवळ ये अशी तू 

गडे हा जरासा रुसावा कशाला


तुझी साथ मजला सहस्त्रे सुखाची 

दुजा जीवनाला उतारा कशाला


तुझ्या वेदना मलम माझ्या मुखाचे

मिथ्या आसवांचा पसारा कशाला


असे मिसळूनी आज जाऊत दोघे

क्षणिकही मनांचा दुरावा कशाला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance