दोन ध्रुवावर... दोघे आपण...
दोन ध्रुवावर... दोघे आपण...
मी ना तुझ्यात... नाही तू माझ्यात
पण तरीही आपण एकमेकात
तुझे विचार त्यात माझे शब्द
माझ्या भावना त्यात तूच सर्वत्र
जवळ असूनही दुरावलेले
दोन ध्रुवावर दोघे आपण विसावलेले
ना जाण मला नैतिकतेची
ना जाण मला सामाजिकतेची
तुझ्या हृदयी नाव असावे...
हीच आशा वेड्या प्रीतीची
भावनांच्या सप्तपादित आधीच सामावलेले
दोन ध्रुवावर दोघे आपण विसावलेले
तू तुझ्यात सदैव व्यस्त...
माझा नसूनही तुझ्यातच अस्त
मी शांत सागर आणि तू फेसाळलेल्या लाटा
तुझ्या उसंत सादेला...
माझा अबोल हळुवार प्रतिसाद...
तरीही क्षणिक विरहाने दुरावलेले
दोन ध्रुवावर दोघे आपण विसावलेले

