STORYMIRROR

trupti kadam

Romance

1  

trupti kadam

Romance

सांग ना रे सख्या तू असा कसा..?

सांग ना रे सख्या तू असा कसा..?

1 min
3.2K


मनातले प्रेम चेहऱ्यावर दिसू देत नाहीस,

डोळ्यांनी बोलतोस पण

ओठांवर येऊ देत नाहीस,

तुझा हा प्रेमाचा खेळ मी ओळखू तरी कसा....!!

सांग ना रे सख्या तू असा कसा......???


फोनवर बरेच सांगतोस पण

प्रेमळ काहीच बोलत नाही

भेटीच्या तारखा ठरवतोस पण

भेटणे काही होतच नाही

आहेस माझा प्रियकर पण भासे जणू मित्र जसा....!!

सांग ना रे सख्या तू असा कसा......???


तुझ्यावर केलेली कविताही तू

वाचून नुसता हसतोस,

वाटतं काहीतरी बोलशील पण

"छान" बोलून गप्प बसतोस

प्रोफेशनल तुझं वागणं तू रोमांटिक होशीलच कसा...!!

सांग ना रे सख्या तू असा कसा......???


आजारी असले जरी मी तरी

तू एकदाच फोन करतोस,

त्यातही तब्येत विचारायची सोडून

काहीतरीच बडबडत बसतोस,

आहे जसा माझ्या मनातला राजा नाहीच मुळी तू तसा...!!

सांग ना रे सख्या तू असा कसा......???


रागावलेच मी तर

तुला मुळीच करमत नाही,

माझ्याशी बोलल्याशिवाय

तुलाही राहवत नाही,

समजून घेते मी तुला कारण मला ही तू आवडतोस असा

सांग ना रे सख्या तू असा कसा......???


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance