धर्मनिरपेक्षता??
धर्मनिरपेक्षता??
हीच कारे तुमची धर्मनिरपेक्षता??..
हा माझा सण तो त्यांचा सण
मुरडून पडले नाकास व्रण
तो करेल यांच्या धर्माची टीका
मग हा हि बोलेल बका बका
विरोधी पोस्टसचा मग पाऊस
आणि म्हणे आम्हास सगळी हौस
याच्या सणाला इतिहासाचे दाखले
तर त्याचे सण परंपरात वाकले
याचेच देव फक्त सर्वश्रेष्ठ
आणि त्याचे मात्र कनिष्ठ
याची जात आरक्षणात धुंद
आणि त्याची जात नेहमीच मंद
याचा नेता याचा राजा
मग त्याच्याही मसीहाचा गाजावाजा
सोशल मीडिया करवी
धर्मांध लोक माथे फिरवी
मग शिकलेलाही ठेवी अक्कल गहाण
फॉरवर्ड वाल्यांची बनते कमान
ज्या शाळेत एकत्र बोललो जनगणमन
त्याच व्हाट्सअप्प ग्रुप वर तोडली मन
ज्या फेसबुक वर आहोत परिवार सम
तिथेच धर्मावरून होतोय गरम
आठवा रे ते स्वातंत्र्य समर
किती झाले त्यात अमर
आठवा सीमेवरील शहीद
कोणाच्या धर्मासाठी गोळी झेलीत
लावा या द्वेषास सुरुंग
उमटूदे प्रेमाचे तरंग
माणूस जन्मतो त्याच्या धर्मात
पण खरे सुख भारतीय म्हणून मरण्यात
जर आहे गोड तिळगुळ लाडू
शिरखुर्मा नि प्लमकेकहि नाही कडू
नाहीतर पुन्हा अवतरावे लागेल थोराना
एकात्मतेचा पाठ पढवायला
ओरडून सांगायला पुन्हा
भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र
पण...
हीच कारे तुमची धर्मनिरपेक्षता
हीच कारे...??
