धन्य तू आई
धन्य तू आई
जीवनी धन्यता तू आई
पेरते प्रकाश जीवनी..
काय सांगू आई असते खरी.
अंधाराची वाट वाकडी करून
पेरते प्रकाश जीवनी..
अंधारातून वाट काढता
कधी देई प्रकाश जीवनी
उभे आयुष्य जाळले होते
तीने या एका आशेवरती
सुर्यासम उर्जेच दान देत
राहिली इतरास तू माऊली
थकली आता तरी नाही
थकली तू मनाने कधी ही
पेरते आत्मविश्वासचे बियाणे
अन, उमेदीचे खत पाणी
बहर येतो मग जीवनी,
उजळून निघते निशाही
अंधारमय होण्याधी तू
पेरते प्रकाश जीवनी
आई तू जणू रवी
भास्करच मुलांसाठी
सुख पेरत असताना ही
दिले सगळच कस दान
थकल्या नजरेत तुला
आजही आशा पिल्लंची
एक हाक यावी कानी
त्यांची ही असे अशीच
अवस्था कधी पुन्ह भेटी ती
सांगता भरारीचे पोवाडे
ऐकु अनुभवतील बोल जुने
आजही आई तुझ्या त्या
खतपाण्याचे मोल मज भारी
आशिर्वाद तुझा करे प्रकाश या जीवनी
आई जाणते मी निःस्वार्थ कर्म लक्ष्मी तू जीवनी
