STORYMIRROR

Sudam Agale

Romance

3  

Sudam Agale

Romance

धागा विश्वासाचा

धागा विश्वासाचा

1 min
337

मी फूल एका बागेचं

तू दुसऱ्या बागेची कळी,

अलगद असं आलो जवळ 

तो... हार गुंफण्यावेळी!


मखमली तो स्पर्श तुझा गं

हवा हवा मज वाटे त्यातला,

गोडीने अजून जवळी घेई

अदृश्य तो धागा आतला!


विरघळली होतीस तुही माझ्यात

नुसती जवळ नव्हती तू,

जन्मभराचा भयाण एकांत जरी

माझ्या फक्त भवती तू!


तुडूंब भरलेले हे प्रित तळे

वैशाखातही आटणार नाही,

"विश्वासाचा अतूट धागा" 

तोडल्याने ही तुटणार नाही!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance