Revolutionize India's governance. Click now to secure 'Factory Resets of Governance Rules'—A business plan for a healthy and robust democracy, with a potential to reduce taxes.
Revolutionize India's governance. Click now to secure 'Factory Resets of Governance Rules'—A business plan for a healthy and robust democracy, with a potential to reduce taxes.

Sudam Agale

Inspirational

3  

Sudam Agale

Inspirational

देणगी

देणगी

1 min
194

अंगावरती नाही कपडे 

पोटात मरणाची भूक, 

स्वाभिमानाने जाण्याची 

झाली मोठी चूक |

गुलामगिरी नाही केली 

नाही कुणाचे पाय चेपले, 

मनगटावर विश्वास ठेऊन 

कर्म करीत राहिलो आपले |

कधी पावसात कधी उन्हात 

मरणाच्या मरणयातना भोगल्या, 

भीक मागावी खळगी भरण्यासाठी 

अशा इच्छा मनी कधी न जागल्या |

देवाने हा मला जन्म दिला 

ही एकच देणगी स्वीकारली, 

पदोपदी मज जी लाचार ठरवेल 

ती प्रत्येक गोष्ट ठोकरली |

स्वाभिमानाचा झोका आगळाच 

मन स्वच्छंदपणे झुलून जातं, 

नसो दमडी खिश्यात तरी ही 

हसू ओठावर फुलून जातं |

Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational