Unveiling the Enchanting Journey of a 14-Year-Old & Discover Life's Secrets Through 'My Slice of Life'. Grab it NOW!!
Unveiling the Enchanting Journey of a 14-Year-Old & Discover Life's Secrets Through 'My Slice of Life'. Grab it NOW!!

Sudam Agale

Romance

3  

Sudam Agale

Romance

प्रेमाचा पाऊस

प्रेमाचा पाऊस

1 min
251


ओल संपली नात्यात 

वाळून गेला जिव्हाळा, 

वनव्याहूनही भयंकर 

असतो एकांताचा उन्हाळा |


आपलं नाही कुणी येथे 

ही सल असते नेहमी सलत, 

टोचतात रोज हजारो काटे 

कळ्या मात्र नाही हो फुलत |


आज तु पाहून हसलीस 

स्तब्ध झालं सारं, 

डोळ्यात दाटली स्वप्न 

डोक्यात शिरलं वारं |


*प्रेमाचा पाऊस* पडला 

पसरली कस्तुरी गंधाची दरवळ, 

तुझ्या एका क्षणाच्या हसण्याने 

माझ्या स्वप्नाच्या झाली हिरवळ |


विश्वासाचं नातं हे 

अतूट बनतं विश्वासावर, 

*प्रेमाचा पाऊस* हा प्रिय 

असाच बरसू दे जन्मभर |


Rate this content
Log in

More marathi poem from Sudam Agale

Similar marathi poem from Romance