देव जाले अवघे जन
देव जाले अवघे जन
देव जाले अवघे जन ।
माझे गुण दोष हारपले ॥१॥
बरवें जालें बरवें जालें ।
चित्त धालें महालाभें ॥ध्रु.॥
दर्पणीचें दुसरें भासे ।
परि तें असे एक तें ॥२॥
तुका म्हणे सिंधुभेटी ।
उदका तुटी वाहाळासी ॥३॥
