डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम (पाळणा)
डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम (पाळणा)
1931या सालाला,
बाळ ए.पी.जे अब्दुल कलाम जन्माला
धरती मातेला आनंद झाला
नवचैतन्य दिसू लागले जगाला ! जो बाळा,जो,जो रे जो
असा हा बाळ वाढू लागला
गरीबीचा वारसा होता संगतीला
संघर्ष जीवन प्रेरणा जगाला
गरीबीत उच्च शिक्षण घेण्याला! जो बाळा जो जो रे
नवे शोधक लाभले भारताला
अणुशास्रज्ञ भारत संरक्षणाला
मिसाईलचे जनक,लाभले भारताला
नवा इतिहास त्यानी रचला! जो बाळा जो जो रे जो
छंद होता त्याना गाढा अभ्यासाचा
हाडाचे शिक्षक छंद अध्यापनाचा
नवे नवे बालमनाला शिकविण्याचा
बालमनात स्वप्न पाहण्याचा! जो बाळा जो जो रे जो
त्यांच्या कार्याचा गौरव करून
भारताने गौरविले भारत रत्न देऊन
असा हा अनमोल हिरा आठवण
भारताची त्यानी राखली शान! जो बाळा जो जो रे जो
महानलेखक ,थोर समाजसेवक
विचारांचे क्रांती विचार प्रेरक
संस्कृती, संस्कार अंगीकारक
देशाचे राष्ट्रपती, देशसेवक ! जो बाळा जो जो रे जो
सेवा अर्पण करून भारताला
आठवण त्यांची वाचन प्रेरणा दिनाला
समृद्ध भारत, बालक घडविण्याला
कार्याने महापुरुष अमर झाला! जो बाळा जो जो रे जो
