डाव
डाव
कालचा डाव खोटारडा निघाला
माझाच सरदार भेकाडा निघाला
पुकारला ज्यांच्यासाठी मी यल्गार
त्या साऱ्या टोळ्यांचा टापू थंडगार निघाला
कोणत्या सरकारने केली दारूबंदी
त्यांचा मुखीयाच दारुडा निघाला
ज्याला समजले आम्ही तिर्थक्षेत्र
तो इतिहास उकिरडा निघाला
जरी भांडली काल तुला ती रासा
तुझ्यासाठीच तिचा हांबाडा निघाला