दाटतांना
दाटतांना
दुःखाने का आड यावे सुख मनी दाटतांना
आसवानी का हसावे दुःख उरी दाटताना
स्वप्न उरी बाळगावे चांदण्याणी भारलेले
काजव्यापरी का फिरावे सुख रात्री दाटताना
चंद्र काळा आवसाचा सूर्या आडुन दिसावा
जीव माझा सुखावा याद तुझी दाटताना
मोग-याचा गंध होता रातराणीचा सुगंध
एकांतात पाहिला तो सुख मनी दाटताना

