चिऊताई
चिऊताई
अगं चिऊताई ,
सांग ना ग मला ,
किती गोड आहे ,
हा सगळा मेळा ||१||
दोघे फिरू खाऊ ,
खाऊ -खाऊ गोड ,
खूप नाचू खेळू ,
बोलत गोड गोड ||२||
आला बघ चिमणा ,
आई आई करत ,
बाळाला घेते आई ,
सांग ना रे करत ||३||
किती गोड ही माया ,
हृदय भरून येई ,
सदा हसत खेळत राहो ,
सर्व असेच म्हणत राही ||४||