चिऊताई
चिऊताई
अग चिऊताई ,
सांग ना ग मला ,
किती गोड आहे ,
हा सगळा मेळा ||१||
सगळे फिरू खाऊ ,
खाऊ -खाऊ गोड ,
खूप नाचू खेळू ,
बोलत गोड गोड ||२||
आला बघ चिमणा , आई आई करत ,
बाळाला घेते आई , सांग ना रे करत ||३||
किती गोड ही माया ,
हृदय भरून येई ,
सदा हसत खेळत राहो ,
सर्व असेच म्हणत राही ||४||