STORYMIRROR

Amruta Dhekane

Romance Inspirational

3  

Amruta Dhekane

Romance Inspirational

चैतन्याची पंढरी...

चैतन्याची पंढरी...

1 min
191

मनाचा प्राजक्त

आज तुज्यातच् उमलला

दव बिंदूनी सजलेला

अलगद चित्तावर विसावला

अंदाज जपू लागला

उभरत्या आठवणीच्या

इशाऱयाने

सुगंध सांडू लागला

प्रसन्न सकाळच्या

किरणाने

भिजू लागले मन

चिंब त्या भावनेच्या उल्हासात

थिरकू लागले पाय

तुझ्या च लयीच्या तालात

वारा ही मागे पडला

जशी गिरकी

उमगली अंतरी

तुझ्या नावनेच

मनी दुमदुमली

चैतन्याची पंढरी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance