इवल्या माझ्या जाणिवा......
इवल्या माझ्या जाणिवा......
1 min
181
ताल धरला
थेंब अवतरला
भूवरी ह्या जीवनी
टप टप वाजे
काळीज माझे
तो हर्ष सांडला धरणी
कुतूहल असे कि हिरवाई नटली
तो साज भवती लेवुनी
मेघ हि सरला
अंधकार झाला
वीज हि कडाडे भान हरपुनी
वर्षा म्हणावे तिला का
त्या चकोराचे जीवन
भास म्हणावे तिला का
त्या मयुराचे आनंदवन
काळ अवतरावा तसा
वारा वाहे
गर्जती ह्या धरा
विषण्ण त्या मनी दाटे
तो पाऊस माझा
का त्या इवल्या माझ्या जाणिवा
