आई.....
आई.....
1 min
194
मनात ठसलेली
मनात रुजलेली ती वात्सल्यमूर्ती
अंगणात दरवळलेली
मनात रुळलेली
ती आई
शब्द झाले तोडके
बोलण्या हे नाते
मनाची ओंजळ का
अजूनी रीतीच भासे
शब्द अपुरा
भाव अपुरे
मनाच्या कोंदणात
निर्व्याज ते सौख्य
हसरे
