Tanaya More

Inspirational

4.6  

Tanaya More

Inspirational

चार दिवसांचे आयुष्य

चार दिवसांचे आयुष्य

1 min
12.7K


आयुष्य असतं दिवसांचं चार,

चार दिवसातच झेलावे लागतात संकटांचे वार,

ज्याला समजला या आयुष्याचा सार,

या चार दिवसातच गुंफेल तो यशाचा हार||


चार दिवसातील, दोन दिवसात होते सुखाचे आगमन,

व दोन दिवस करावे लागते दु:खाला नमन,

या दोघांचेच असते आपल्या आयुष्यात चलन,

एका ना एकाच्या जावे लागते स्वतःहून शरण||


आयुष्याची एकच गाथा, ती म्हणजे

संकटं असतात शत्रु, सुख असतात सोबती,

मनुष्य संकटात एकटा राबती,

व सुखात चारजण चालतात बरोबरी||


आयुष्याचे एक हेच सत्य,

कष्ट हा मोठा तथ्य

कष्टानेच जगायचे हे चार दिवस,

चार दिवसातच करायचा यशाला नवस||


Rate this content
Log in